ओडिशा रेल्वे अपघातप्रकरणी अधिकाऱ्यांसह पाच जण ताब्यात

ओडिशा, १२ जून २०२३: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघात प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका रेल्वे अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताचा तपास सीबीआयचे दहा सदस्यीय पथक करत आहे. या प्रकरणी रेल्वे अधिकाऱ्यांसह अनेकांची चौकशी झाली आहे.

रविवारी सायंकाळी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेवेळी प्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या ९ अधिकाऱ्यांची चौकशी केली जात आहे. यामध्ये सहाय्यक स्टेशन मास्तर आणि गेट मॅनचाही समावेश आहे. सीबीआयने बहनगा बाजार रेल्वे स्थानक सील केले आहे. सीबीआयच्या परवानगीशिवाय या स्थानकांवर कोणत्याही रेल्वेला थांबू दिले जाणार नाही.

सीबीआयचे पथक बहनगा बाजार रेल्वे स्थानकावर सखोल तपास करत आहेत. सीबीआयने येथील विविध संगणकांच्या हार्ड डिस्कही जप्त केल्या आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाची नोंदवलेली तथ्येही गोळा करण्यात आली आहेत. नंतर बहंगा स्थानकांत खाजगी नंबर एक्सचेंज बुक तपासले. यावेळी टीमने रिले रुम, पॅनल रुम आणि डेटा लॉकर सील केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा