भारतासाठी पाच राफेल विमान रवाना

यूएई, दि. २८ जुलै २०२०: भारताने फ्रान्स कडून मागवलेल्या पहिल्या पाच विमानांची तुकडी संयुक्त अरब अमीरात म्हणजेच यूएई मध्ये दाखल झाली आहे. फ्रान्समधील मेरिनेक हवाई तळावरून या राफेल विमानांनी भारताकडे येण्यासाठी उड्डाण भरले होते. सलग सात तास या विमानांनी उड्डाण केले. भारताला स्वाधीन करण्यासाठी देण्यात येणाऱ्या पाच विमानांची तुकडी संयुक्त अरब अमीरात मधील अल दफरा या हवाई अड्ड्यावर सुरक्षित उतरली आहे.

संयुक्त अरब अमीरात मधील अल दफरा या हवाई अड्ड्यावर उतरवण्यात आलेल्या या विमाना मागे असे कारण आहे की वैमानिकांना थोडीफार विश्रांती मिळावी जेणेकरून पुढील उड्डाणात त्यांना कोणताही त्रास होणार नाही. हे पाचही राफेल विमाने तब्बल ७००० किलोमीटर अंतर पार करत २९ जुलै रोजी भारतामध्ये दाखल होतील. भारतामध्ये अंबाला या हवाई तळावरील हवाई दलाच्या संघामध्ये या विमानांना सामिल करून घेतले जाईल.

विशेष म्हणजे २०१६ साली फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी करार झाला होता. या करारानंतर राफेल विमानांची ही पहिली खेप भारताला मिळाली आहे. कोरोनामुळे विमानाच्या वितरणास थोडा उशीर झाला. करारानुसार दोन वर्षांत भारताला ३६ राफेल विमान मिळणार आहेत.

२०२१ डिसेंबरपर्यंत सर्व ३६ राफेल विमान फ्रान्समधून भारतात येतील, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी, राफेल विमाने फ्रान्सच्या मरीनॅक एअरबेसवरून भारतात रवाना झाली. यावेळी फ्रान्समध्ये भारताचे राजदूत जावेद अशरफदेखील एअरबेसवर उपस्थित होते.

भारतीय राजदूतांनी वैमानिकांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच राफेलचे निर्माता दासॉल्ट एव्हिएशनचे ही अभिनंदन केले. २०१६ मध्ये भारत सरकारने ३६ राफेल विमान खरेदीसाठी फ्रान्सबरोबर करार केला होता. दरम्यान विमानांच्या खरेदी वरून काँग्रेसने एनडीए सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला होता. २०१९ च्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी यांनी हा मुद्दा उचलून धरला होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा