औरंगाबादमध्ये पाच दुकाने आगीत खाक

10

औरंगाबाद, २५ जानेवारी २०२३ : शहरातील शहानूरमियाॅं दर्गा भागातील एका दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. हळूहळू ही आग आजूबाजूच्या चार ते पाच दुकानांना आग लागली. ही आग इतकी भीषण होती, की एकानंतर एक दुकाने आगीत खाक झाली. मंगळवारी (ता.२४) रात्री साडेआठ वाजता ही घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच चार बंब घटनास्थळी रवाना झाले होते. आगीत सात लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जवाहरनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तासभर दलास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. विशेष म्हणजे ‘श्रीहरी पॅव्हेलियन’च्या बाजूलाच ट्रॅव्हल्स लावलेल्या असतात. तिथे जवळपास २५ ते ३० ट्रॅव्हल्स उभ्या होत्या. त्याही तत्काळ बाजूला काढण्यात आल्या.

दरम्यान, ८.३० वाजेदरम्यान दुकानांना आग लागली. ८.४३ दरम्यान अग्निशामकचे बंब घटनास्थळी आले. ९.३५ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. घटनास्थळी दीड ते दोन हजार नागरिकांचा जत्था जमल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येत होत्या.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा