गोल पोस्ट महाराष्ट्र जिल्हा महाड तालुक्यात पाच मजली इमारत जमीनदोस्त

महाड तालुक्यात पाच मजली इमारत जमीनदोस्त

रायगड, २४ ऑगस्ट २०२०: महाड तालुक्यातील साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळची पाच मजली इमारत कोसळली. महाड शहरातील काजळपुरा परिसरात निवासी इमारत पत्त्यासारखी कोसळली आसून, या दुर्घटनेत किती जण जखमी झाले याचा आकडा अद्याप समजला नाही. पण ४७ नागरिक अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. ही दुर्घटना सोमवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली असून बचावकार्य सुरु झाले आहे.

दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे १० वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या ५ मजली इमारतीत साधारण ५० फ्लॅट होते. यात २०० ते २५० लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version