इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मधून दिसले पाच यूएफओ

मॉस्को, २४ ऑगस्ट २०२०: पृथ्वीवर पाच यू एफ ओ पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन (आयएसएस) येथे रशियन कॉसमोनॉट इव्हान वॅग्नर यांनी त्यांना पाहिले आहे. अंतराळवीरांना रशियामध्ये कॉस्मोनाट्स म्हणतात. इवानने ही पाच यूएफओ पाहिली, जी पृथ्वीच्या दक्षिणेकडील गोलार्धावर काही सेकंद बघण्यास मिळाली.

आयएस अटांर्टिका वरून जात असताना इव्हान टाइमलाप्स व्हिडिओ बनवीत होता. त्याच वेळी, पाच अज्ञात लाइट्स अरोरा ऑस्ट्रेलिया (सदर्न लाइट्स) मध्ये दिसू लागले. ते एकत्र चालत होते. प्रथम दोन, नंतर तीन, असे करत हे पाचही प्रकाश मय ऑब्जेक्ट एकत्र आले.

यानंतर थोड्याच वेळात ते सदर्न लाइट्सच्या येण्याच्या आधीच वेगळे झाले आणि गायब झाले. यानंतर दोन स्पेसशीप वेगळ्या वेगळ्या ठिकाणावरून पुन्हा निदर्शनास आल्या. आता इव्हान वॅग्नरचा व्हिडिओ रशियन शास्त्रज्ञांना तपासणीसाठी पाठविला गेला आहे.

इवानने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की मला सदर्न लाइट्सशिवाय काही वेगळे दिसले. यावेळी एक विलक्षण गोष्ट देखील दिसून येते. दुसरीकडे, रशियन स्पेस एजन्सी रॉस्कोस्मोसचे प्रवक्ते व्लादिमीर युस्तिमेन्को यांनी व्हिडिओ आश्चर्यकारक म्हणून वर्णन केले आहे. या व्हिडिओची चौकशी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इव्हान म्हणाले की, या पाच उडणाऱ्या वस्तू ९ ते १२ सेकंदासाठी एकत्र आल्या आहेत. त्यानंतर ते वेगळे झाले. टाइमलॅप्स सामान्य व्हिडिओमध्ये रूपांतरित केले गेले असता हा व्हिडिओ ५२ सेकंदाचा झाला होता. टाईम ॲप्स व्हिडिओमध्ये दहा ते बारा सेकंदानंतर हे सर्व ऑब्जेक्ट्स वेगळे झाले व नंतर अदृश्य झाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा