मुंबई, १५ ऑगस्ट २०२०: सध्या देशावर कोरोनाचे संकट पसरताना दिसत आहे. याचा सर्वात जास्त प्रभाव राज्यामध्ये दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या आवारामध्ये ध्वजारोहण केले. यावेळचे ध्वजारोहण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना युद्धांच्या समवेत केले.
यावेळी विशेष आमंत्रित कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. तसेच या व्यतिरिक्त यावेळी मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि उच्च स्तरीय अधिकारी यांच्यासोबत मुख्यमंत्री यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी राज्यमंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते “डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत” अशा भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या.
ध्वजारोहणानंतर संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी विशेष वक्तव्य केले. कोरोनाव्हायरसचे संकट पाहता सध्या वैद्यकीय सेवा महत्त्वाच्या आहेत आणि याकडेच लक्ष केंद्रित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचं हित जोपासलं जाईल. आपल्या संबोधन दरम्यान पुढील घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या.
शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार
गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार
कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य
जय जवान जय किसान, जय कामगार
डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे.
कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.
पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान
ऑनलाइन शिक्षण सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार
न्यूज अनकट प्रतिनिधी