तांदुळवाडी १५ ऑगस्ट २०२०:ध्वजारोहण म्हटले की, डोळ्यांसमोर शाळेतील विद्यार्थ्यांची किलबिल, सर्वत्र उत्सुकतेचे वातावरण, शाळेची सजावट आणि वंदे मातरम् भारत माता की जय अशा विविध घोषणांचा आवाज, पण या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनी होत असलेला ध्वजारोहण हा वेगळाच.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन आहे. या महामारीच्या काळात नागरिकांच्या हितात प्रशासनाने अनेक मोठमोठे निर्णय घेतलेले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळा कॉलेज हे सर्व बंद ठेवण्यात आलेले आहेत, ऑनलाईन क्लासेस घेतले जात आहेत. कामकाजासाठी फक्त शिक्षक कर्मचारी हेच शाळेत/ कॉलेज मध्ये जाऊ शकत आहेत.
आज १५ ऑगस्ट २०२० देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्ष झाले. आणि या ७४ वर्षांमधील यंदाच्या वर्षीचा हा पहिलाच स्वातंत्र्य दिन असेल जो शाळेत कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांशिवाय साजरा केला जात असेल. दरवर्षीची धावपळ, सर्वत्र विद्यार्थ्यांचा असणारा उत्साह, प्रभात फेरी, शाळेत/ कॉलेज मध्ये घेतले जाणारे विविध कार्यक्रम, बक्षीस वितरण आणि नंतर सर्वांना देण्यात येणारा खाऊ, हे सर्व चित्र या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसणार नाहीत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि कोरोनाचा संसर्गाकडे गांभीर्याने लक्ष देत या वर्षी स्वातंत्र्य दिन फक्त शिक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांच्याच उपस्थित साजरा करण्यात यावा असे प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासनाच्या या आदेशाचे पालन करत सर्व प्रशासनाला सहकार्य देखील करत आहेत.
स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जय हिंद
न्यूजअनकट प्रतिनिधी- प्रगती कराड