फ्लेवर कंडोम वापरताय… मंग काळजी घ्या!

तसे पाहिले तर सेक्स या विषयावर आपण प्रत्येकजण बोलणे टाळतो. कारण तो प्रत्येकाच्या आयुष्याचा अंतर्गत विषय असतो. या शिवाय सेक्युल हेल्थविषयी सुद्धा अनेक जण उघडपणे बोलणे टाळतात.

ज्यावेळी तुम्ही आणि तुमचा पार्टनर शारीरिक संबंध ठेवतो ते योग्य आहे का? या संबंधामुळे होणाऱ्या जीवघेण्या आजारांबाबत माहिती घ्यावी. आज आपण अशी गोष्ट पाहणार आहोत की ज्याचा सेक्स करताना फार उपयोग होतो. ती वस्तू म्हणजे कंडोम.आज बाजारात अनेक प्रकारच्या फ्लेवरमध्ये कंडोम उपलब्ध आहेत. पण ते किती सुरक्षित आहेत. किंवा त्याचा वापर करावा की नाही या विषयी आज माहिती समजून घेऊ या.


मुख्यतः सेक्शुअल प्लेजर वाढवण्यासाठी फ्लेवर कंडोमची सुरूवात झाली. नॉर्मल कंडोमचा फ्लेवर रबरसारखा असतो. त्यामुळे मोठ्या संख्येने कपल्स ओरल सेक्स करू शकत नव्हते. त्यामुळेच फ्लेवर कंडोमची सुरूवात केली गेली. जेणे करून जोडप्यांना ओरल सेक्सचा आनंद घेता यावा.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. रमन तंवर यांनी एका वेबसाइड दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘पुरूषांना फ्लेवर्ड कंडोमपासून काहीही नुकसान होत नाही. मात्र, महिला जोडीदाराच्या प्रायव्हेटमध्ये याने नुकसान होऊ शकते.
तंवर यांनी पुढे सांगितले की, फ्लेवर्ड कंडोममुळे महिलांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये खाज, जळजळ, ड्रायनेस किंवा लुब्रिकन्टची कमतरता अशा समस्या होऊ शकतात. याने व्हजायनाच्या पीएच लेव्हलमध्ये गडबड होऊ शकते. सोबतच फ्लेवर्ड कंडोममध्ये शुगरचे प्रमाणही असते. जे व्हजायनासाठी चांगलं नसते.
डॉक्टरांनी सांगितले की, फ्लेवर्ड कंडोमबाबत फार भितीही वाटून घेण्याची गरज नाही. जर तुम्ही स्वस्त फ्लेवर्ड कंडोमचा वापर करत असाल तर याने अर्थातच नुकसान होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे चांगल्या ब्रॅन्डच्या फ्लेवर्ड कंडोमचा वापर करू शकता. यांनी त्वचेला कमीत कमी नुकसान होते.

त्यामुळे कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध ठेवताना कंडोम चांगल्या प्रकारचा घेणे आवश्यक आहे. जेणे करून आपल्या पार्टनरला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा