‘फ्लाईंग शिख’ मिल्खा सिंग

32
भारतीय क्रीडाजगतातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्व म्हणजे ‘मिल्खा सिंग’. जीवनात अटीतटीचे संघर्ष येऊनही मिल्खांनी आपले ध्येय सतत डोळ्यासमोर ठेवले.
  त्यांनी मेहनत आणि जिद्दीच्‍या जोरावर अशक्‍यप्राय अशी गोष्‍ट करून करून दाखवली. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त जाणून घेऊ काही खास गोष्टी…
  • मिल्खा सिंग यांना इंडियन आर्मीत जाण्याची इच्छा होती. ते तीन वेळा अपयशी ठरले. पण त्यांनी कधी हार मानली नाही. अखेर चौथ्यांदा ते यशस्वी झाले.
  • केवळ दूध आणि अंडी खायला मिळावी म्हणून सैन्यात दाखल झालेल्या मिल्खा सिंग यांनी धावण्याच्या शर्यतीमध्ये भाग घेतला. त्यांनी शर्यत जिंकली आणि तिथूनच भारताला एवढा महान धावपटू मिळाला.
 •  मिल्खा सिंग असे धावपटू आहेत ज्यांनी कोणत्याही सरावाशिवाय, कोणत्याही आर्थिक मदतीविना, कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय ऑलिम्पिकमध्ये 400 मीटर हे अंतर त्याने 45.9 सेकंदात पार केले होते.
  • पाकिस्तानात 1960मध्ये भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जाण्याची इच्छा नसतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाखातर त्यांना जावे लागले होते.
  •  मिल्खा सिंग यांचे टोपण नाव ‘फ्लाइंग सीख’ आहे. त्यांना हे नाव पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती आयुब खान यांनी 1960 मध्ये दिले होते.
  • 1958 मध्ये मिल्खा सिंगने कार्डिफ कॉमनवेल्थ खेळात 400 मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी मिल्खा कॉमनवेल्थ खेळात वैयक्तिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.
  •  मिल्खा सिंग यांनी जिंकलेली सर्व पदके, चषक, ब्लेझर व जे बूट घालून विक्रम मोडला ते बूट राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले होते.
  • मिल्‍खा सिंग यांना त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल भारत सरकारचा अर्जुन आणि पद्मश्री पुरस्‍कार मिळालेला आहे.
  • मिल्खा यांचा विवाह भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधार निर्मल कौरसोबत झाला. त्यांचा मुलगा जीव सिंग गोल्फचा प्रसिद्ध खेळाडू आहे.
  • मिल्खा सिंग यांचे ‘द रेस ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्रही प्रकाशित झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा