आसाममध्ये २२ जिल्ह्यात पूर १६ लाख लोक प्रभावित

दिस्पूर 3 जुलै २०२० : आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मते, राज्यातील पूर परिस्थितीमुळे २२ जिल्ह्यांमध्ये १६ लाखांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत.

गुरुवारी मटिया जिल्ह्यात एकाच्या मृत्यूची नोंद झाली असून मृतांचा आकडा ३४ झाला आहे. आसामच्या २२ जिल्ह्यांमध्ये १६,०३,२५५ लोक प्रभावित झाले आहेत आणि १२,५९७ लोक १६३ मदत शिबिरात वास्तव्यास आहेत, असे प्राधिकरणाने सांगितले. स्थानिक लोक म्हणाले की, “सरकारकडून कोणीही आमच्या भागाची पाहणी करायला आले नाही. राज्य सरकारने आम्हाला मदत करावी आणि थोडा दिलासा द्यावा. येथे परिस्थिती अतिशय वाईट आहे.” बाधित झालेल्या २२ जिल्ह्यांमध्ये धेमाजी, लखीमपूर, बिस्नाथ, दरंग, नलबरी, बरपेटा आणि इतर काही जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यभरातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने कहर निर्माण केला आहे.

भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) सोमवारी दिब्रुगडमध्ये पुढील चार दिवस पाऊस किंवा गडगडाटी पावसासह सर्वसाधारणपणे आकाश ढगाळ असण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे दिब्रूगडच्या कालाखोवा भागातील गावे पूरानंतर सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.

अशीच परिस्थिती तिनसुकिया जिल्ह्यातील ग्रामस्थांना भेडसावत होती. दरम्यान, गुईजन परिसरातील स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा