आसाममध्ये पुराचं थैमान, 32 जिल्ह्यांमध्ये 31 लाख लोक बाधित, 25 मृत, 8 अजूनही बेपत्ता

8

आसाम, 19 जून 2022: आसाममधील पूरस्थिती शनिवारी चिंताजनक पातळीवर पोहोचली. या पुराने चार मुलांसह आणखी आठ जणांचा बळी घेतला. पुरातील मृतांची संख्या 25 वर पोहोचली आहे. या वर्षी राज्यातील पूर आणि भूस्खलनात एकूण मृतांची संख्या 62 वर गेलीय. दुसरीकडं, इतर आठ जण बेपत्ता आहेत. होजई जिल्ह्यातून चार जण बेपत्ता आहेत तर इतर चार जण बजली, कार्बी आंगलाँग पश्चिम, कोक्राझार आणि तामुलपूर जिल्ह्यातून बेपत्ता आहेत.

दुसरीकडं, राज्यातील 32 जिल्ह्यांमध्ये सुमारे 31 लाख लोकांना पुराचा फटका बसलाय. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचं पाणी 4,291 गावांमध्ये शिरले असून 66455.82 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेलीय.

बारपेटा येथील जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, येथील ग्रामस्थ त्यांच्या घरात अनेक मौल्यवान वस्तू असल्याचे सांगून घरे सोडण्यास तयार नव्हते, परंतु आम्ही कसे तरी त्यांना घरे रिकामी करण्यास राजी केलं आणि त्यांना मदत छावण्यांमध्ये नेण्यासाठी आता व्यवस्था केली जात आहे.

येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिघडू शकतेः अधिकारी

अधिकाऱ्याने सांगितलं की, पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आलीय. नजीकच्या भूतानमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यालाही याचा फटका बसत असून येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.

माहितीनुसार, राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या 514 मदत शिबिरांमध्ये 1.56 लाखांहून अधिक बाधित लोकांनी आश्रय घेतलाय. बाजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कचार, चिरांग, दररंग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा-हसाओ, गोलपारा, गोलाघाट, होजई, कामरूप, कामरूप (एम), कार्बी आंगलांग पश्चिम, करीमगंज, कोकराजहर हे बाधित जिल्हे आहेत. लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी यांचा समावेश आहे.

नलबारीतील एका पूरग्रस्ताने सांगितलं की, गेल्या 3-4 दिवसांपासून आम्ही पुराच्या पाण्यात बुडत आहोत आणि आमची घरेही वाहून गेली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोणीही आमच्या मदतीला आलेलं नाही. आम्हाला जेवण दिलं जात नाही, गेल्या चार दिवसांपासून मी उपाशी आहे.

बचाव पथक लष्करासोबत मदतकार्यात गुंतले आहे

दुसरीकडं, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आसाम पोलिसांच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांसह निमलष्करी दलांनी 24×7 बचाव आणि मदत कार्य सुरू केलंय. पुराचा शेकडो घरांवर वाईट परिणाम झालाय आणि अनेक रस्ते, पूल आणि कालवे यांचं नुकसान झालं आहे, तसेच अनेक बंधारे तुटले आहेत. ब्रह्मपुत्रा, बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली आणि जिया-भराली नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा