पुरंदर, दि.१४ ऑगस्ट २०२०: येणाऱ्या गणेशोत्सव काळात कोरोना आजार पसरू नये, म्हणून गणेश मंडळांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन कराव्यात. अशा सूचना सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी दिल्या आहेत.
सासवड पोलिस स्टेशन हद्दीतील गणेश मंडळांच्या निवडक कार्यकर्त्यांची आज (दि.१४) दुपारी सासवड पोलीस स्टेशन मध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुढील काळात गणेश उत्सव साजरा करताना घ्यावयाच्या खबरदारी बाबत सासवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की सध्या कोविडचा आजार पसरू नये, म्हणुन गणेश मंडळांनी कळाजी घेणे आवश्यक आहे. शासनाच्या निर्देशा प्रमाणे चार फुटपेक्षा कमी उंचीच्या मूर्ती बसवाव्यात. त्याच बरोबर त्या मंडळाच्या जागेतच बसवाव्यात. यावेळी सामाजिक अंतर राखावे. तोंडाला मास्क लावावे. कोणीही विसर्जन मिरवणूक न काढता त्याच जागेवर विसर्जन करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
यावेळी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही. याबाबत काळजी घेतली जाईल. त्यासाठी मंडळाच्या सदस्यातील काही लोकांना काम दिले जाईल. असे या बैठकीमध्ये सर्वांनुमते ठरले. उत्सव काळात पोलीस प्रशासनाला सहकार्य करीत त्यांच्या सूचनांचे पालन करूनच शिस्तबध्दपणे उत्सव साजरा करू असे अश्वासन यावेळी गणेश मंडळांनी दिले. याप्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राहुल घुगे यांसह शहरातील प्रमुख मंडळातील निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी