शाओमीला मागं टाकत सॅमसंग बनली भारतातील नंबर -१ स्मार्टफोन कंपनी

नवी दिल्ली, ३० ऑक्टोबर २०२०: दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग सलग दोन वर्षे भारतीय स्मार्टफोन बाजारात शीओमीच्या मागे राहिली होती. कमी किमतींमुळे शीओमीचा भारतीय स्मार्ट फोनचा बाजारात नेहमीच दबदबा राहिला आहे. पण, यावर्षी सॅमसंगने पुन्हा एकदा आपली जागा मिळवत पहिलं स्थान मिळवले आहे.

मार्केट रिसर्च फर्म काउंटर पॉईंटच्या आकडेवारीनुसार, २०२० च्या तिसर्‍या तिमाहीत सॅमसंगचा बाजार हिस्सा २४% आहे. चीनी स्मार्टफोन निर्माता शिओमीबद्दल बोलताना या कंपनीचा बाजारातील वाटा २३% पर्यंत आहे.

गेल्या वर्षापर्यंत म्हणजेच २०१९ च्या तिसर्‍या तिमाहीत श्याओमीचा बाजारातील हिस्सा थोडा कमी झाला आहे. भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या सीमा ताणावामुळं हे शक्य झालं आहे.

हे उल्लेखनीय आहे की, मार्केट रिसर्च फर्म काउंटर पॉईंटच्या अहवालानुसार दोन वर्षांपूर्वी याच तिमाहीत शिओमीने सॅमसंगला मागं टाकत भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत पहिलं स्थान मिळवलं होतं.

काउंटर पॉईंटच्या मते, शाओमी २०१८ च्या तिसर्‍या तिमाहीनंतर प्रथमच यंदा नंबर -२ वर आली आहे. तथापि, ही परिस्थिती फार काळ टिकेल अशी अपेक्षा नाही आणि पुढच्या तिमाहीत शीओमी पुन्हा नंबर -१ वर जाईल. गेल्या एक ते दोन महिन्यांत शाओमीने जोरदार स्मार्टफोनची विक्री केली असून सणासुदीच्या हंगामातही कंपनीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा