मुंबई, दि.८ मे २०२०: कुख्यात गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच मुंबईच्या दगडी चाळीमध्ये संपन्न झाला. अभिनेता अक्षय वाघमारेसोबत योगिता गवळी आज (शुक्रवारी) आपली लग्न गाठ बांधली आहे.
लॉक डाऊनचे नियम पाळत अगदी मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडल्याचे पहायला मिळाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा विवाह सोहळा अगदी साध्या पद्धतीने पार पडला.
गुरुवारी(दि.७) रोजी दोघांनाही हळद लागली होती. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचाही साखरपुडा झाला होता. या लग्न सोहळ्यात
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबातील सदस्यांनाच लग्नाला उपस्थित राहण्याची परवानगी पोलीसांकडून देण्यात आली होती.
मुलीचे कन्यादान करताना ‘डॅडी’ अरुण गवळी भावूक झाल्याचं पहायला मिळत होते.
न्युज अनकट प्रतिनिधी: