बारामती, दि.१० मे २०२०: सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने नागरिकांनी गर्दी करू नये, अशा सुचना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन होताना दिसत आहे. बारामती शहरातील अक्षता सोमाणी व लातूरच्या आनंद सोनी या दोन्ही कुटुंबातील लोकांनी पूर्वनियोजित असणारा लग्न सोहळा पाच नातलगांच्या उपस्थितीत पार पडला.
बारामती शहरातील सोमाणी कुटुंबातील ऍड. अक्षता सुरेश सोमाणी व लातूर अहमदपूर येथील ऍड. आनंद रामप्रसाद सोनी यांचा विवाह पूर्वीच ठरला होता. मात्र सध्या असणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे लॉकडाऊनची परिस्थिती असल्याने
सोमाणी आणि सोनी या दोन कुटुंबात शुक्रवार दि ८ मे रोजी दुपारी १२.३० वाजता बारामतीतील बालाजी मंदिरात विवाहसोहळा संपन्न झाला.
यावेळी विवाहात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही कुटुंबांनी अत्यंत साध्या पध्दतीने विवाह पार पडला दोन्ही कुटुंबातील सदस्यांची संख्या मोठी आहे. मात्र या बिकटप्रसंगी यांनी वधू आणि वरा यांच्यावर शासनाच्या नियमांचे काटेकोर नियमांचे पालन करीत घरातूनच अक्षता टाकल्या. या विवाह कार्यात दोन्ही कुटुंबातील फक्त १० लोक या सोहळ्यासाठी उपास्थित होते. विवाहाच्या प्रसनागी सोशल डिस्टन्सचे तंतोतंत पालन करण्यात आले. या परिस्थितीत हा एक आदर्श विवाहसोहळा ठरला असून समाजासाठी अत्यंत विधायक संदेश सोमाणी व सोनी या दोन्ही कुटुंबीयांनी दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: