निसर्ग चक्रीवादळामुळे निराधार झालेल्यांना प्रशासनाकडून अन्नधान्य व केरोसीनची मदत

रायगड, २७ ऑगस्ट २०२०: निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील बाधित नागरिकांसाठी शासनाकडून विविध स्तरावर मदत करण्यात येत असून शासनाने आता प्रतिकुटुंब दहा किलो गहू आणि दहा किलो तांदूळ तसेच पाच लिटर केरोसीन मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाअंतर्गत रायगड व रत्नागिरी जिल्यात निसर्ग चक्रिवादळामुळे पुर्णतः नष्ट झालेल्या पक्क्या, कच्च्या घरासाठी व झोपडयांसाठी तसेच अंशत: पडझड झालेल्या (किमान १५% नुकसान) कच्या व पक्क्या घरांपैकी ज्या घरांचे छत क्षतीग्रस्त झाल्याने अथवा पत्रे/छत उडुन गेल्याने घरातील कपड़े व घरगुती भांड्यांचे/वस्तुंचे नुकसान झाले आहे. अशा सर्व निराधार झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब १० किलो गहू. १० किलो तांदुळ व ५ लिटर केरोसिन मोफत पुरविण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

अन्नधान्य व केरोसिनच्या वाटपाचे काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे. अन्नधान्य व केरोसिनचे वाटप पूर्ण केल्यानंतर यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी संपूर्ण तपशीलासह विभागीय आयुक्त, कोकण यांनी शासनाकडे करावी, अशा सूचना प्रशासनाने काल काढलेल्या आदेशामध्ये दिल्या आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा