अनेकदा आपल्याकडून खाण्यात निकृष्ट दर्जाचे खाणे येते. याशिवाय घाई घाईत खाणेही शरीरासाठी चांगले नसते. या गोष्टी फूड पोयजनिंग साठी कारणीभूत ठरतात. फूड पॉयजनिंगची लक्षणे कोणती ते जाणून घेऊ…
लूज मोशन : अनेकदा फूड पॉयजनिंग झाल्यास लूज मोशन होते.त्यामुळे खूप अशक्तपणा येऊ शकतो.
पोटात गाठी : जर काही खाल्यानंतर पोटात जोरात वेदना होत असतील आणि पोटाच्या आजूबाजूला गाठी झाल्यस वेळीच डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे.
उलटी, पोटदुखी : काही खाल्यानंतर उलटी होणे, पोटात दुखणे असा त्रास होत असेल तर हे फूड पॉयजनिंगमुळेही होऊ शकते.
डिहायड्रेशन, कमजोरी : लूज मोशनमुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. तसेच चक्कर, थकवा आणि कमजोरी जाणवू शकते.
ताप : फूड पॉयजनिंगनंतर शरीर गरम होऊ लागते. ताप आल्यासारखे वाटू लागते. जास्त ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.