नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२३ : होळीला घरी जाण्याचा विचार करणार्या रेल्वे प्रवाशांसाठी वाईट बातमी आहे. कारण आयआरसीटीसीकडून पँट्रीमधल्या खाद्यपदार्थांच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. या किंमती वाढवल्याने आता या महागाईचा फटका प्रवाशांना बसणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीने प्रत्येक पँट्री कारमध्ये मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती वाढवल्या आहेत. रेल्वेतल्या जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी सुधारल्यामुळे इथल्या पदार्थांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये चपाती, भाजी, डोसा, सँडविच सहित एकूण सत्तर पदार्थ महाग झाले आहेत.
दरम्यान, पूर्व मध्य रेल्वेने आपले क्षेत्राधिकारातून जाणाऱ्या गाड्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आयआरसीटीसीने ट्रेनमध्ये मिळणारे जेवणाचे दर वाढवले असले तरी, स्टेशनवर मिळणाऱ्या फूड स्टॉल्सच्या किंमती मात्र तशाच ठेवल्या आहेत.
- समोसा १० रुपये
आयआरसीटीसीने ७० वस्तूंची लिस्ट दिली आहे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे दर वाढवण्यात आले आहेत. यामध्ये आता पूर्वी ८ रुपयांना मिळणारा समोसा आता १० रुपयांना मिळणार आहे. तर सँडविच १५ वरुन २५ रुपये, बर्गर – ४० वरुन ५० रुपये, ढोकळा (१०० ग्रॅम) – २० वरुन ३० रुपये, ब्रेड पकोडा – १० वरुन १५ रुपये, बटाटे वडा – ७ वरुन १० रुपये, मसाला डोसा -४० वरुन ५० रुपये आणि चपाती (रोटी) साठी आता ३ नाही तर १० रुपये मोजावे लागणार आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.