जालना १४ ऑगस्ट २०२४ : जालना जिल्ह्यात सद्यस्थितीत श्रावण, गणेश उत्सव आणि सणासुदीच्या दिवसांची सुरुवात होत असल्याने अन्न व औषध प्रशासनाकडून अन्न नमुने तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. सण व उत्सवाच्या काळात जिल्ह्यातील अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या तरतुदीचे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
न्युज अनकट प्रतिनीधी : विजय साळी