राज्यातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता ‘ड्रेसकोड’

मुंबई : राज्यातील हातगाड्यांवर अन्न पदार्खांची विक्री करणाऱ्यांना आता ड्रेसकोड लागू करण्यात येणार आहे.
सध्या या मोहिमेची सुरूवात झाली करण्यात आली आहे. त्यानुसार अगोदर बीड जिल्ह्यापासून याची सुरुवात करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या पुढाकारातून ही मोहिम राबवण्यात येत आहे.
नव्या ड्रेसकोडमध्ये टोपी, हँडग्लोज आणि  अॅप्रनचा समावेश आहे. तसंच खाद्यपदार्थ विक्रेत्यांचीही स्वच्छतेच्या दृष्टीनं तपासणी करण्यात येत आहे.
याव्यतिरिक्त त्यांचे परवानेही तपासण्यात येत आहेत. दरम्यान; या गोष्टींचे पालन न करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात एक रूपया ते एक लाखांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा