देशात सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद १ लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली, १३ जून २०२१: भारतात मागील २४ तासात ८४,३३२ इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आता सलग पाचव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद १ लाखांपेक्षा कमी झाली आहे. हे केंद्र आणि राज्ये- केंद्रशासित प्रदेशांच्या सततच्या आणि एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांचे परिणाम आहेत. भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णसंख्या १०,८०,६९० इतकी आहे. सलग बाराव्या दिवशी ती २० लाखांपेक्षा कमी आहे.

मागील २४ तासांत रुग्णसंख्येत एकूण ४०,९८१ ने घट झाली आणि देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती केवळ ३.६८ टक्के इतकी आहे. कोविड संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. देशात सलग ३० व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील २४ तासात १,२१,३११ रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत ३६,९७९ आणखी रुग्ण गेल्या २४ तासात बरे झाले आहेत.

महामारीच्या प्रारंभापासून कोविड – १९ संसर्ग झालेल्यांपैकी २,७९,११,३८४ लोक बरे झाले आहेत. तर मागील २४ तासात १,२१,३११ रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर ९५.०७ % वर पोहोचला आहे.

देशात चाचण्यांच्या क्षमतेत सातत्याने वाढ कायम असून गेल्या २४ तासात एकूण १९,२०,४७७ चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकूण ३७.६२ कोटींपेक्षा अधिक चाचण्या करण्यात आल्या.

देशभरात एकीकडे चाचण्यांचे प्रमाण वाढत आहे त्याचवेळी साप्ताहिक पॉझिटिव्हिटीमध्ये घसरणीचा कल कायम आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या ४.९४ % इतका, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ४.३९% टक्के इतका आहे. सलग १९ व्या दिवशी तो १० टक्क्यांपेक्षा कमी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा