पुणे, 14 ऑक्टोंबर 2021: अमेरिकेची अंतराळ संस्था नासा पुढील एका आठवड्यात लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी एक मोठे मोहीम आखणार आहे. या मोहिमेचं नाव लूसी एस्टेरॉयड स्पेसक्राफ्ट (Lucy Asteroid Spacecraft) आहे. प्राचीन लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी आणि सौर मंडळाच्या उत्पत्तीचं रहस्य उलगडण्यासाठी लुसी अंतराळात जाईल. या मिशनचा खर्च 7387 कोटी रुपये आहे.
लुसी स्पेसक्राफ्टला अवकाशात पाठवण्याची लॉन्च विंडो 16 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. म्हणजेच, तीन दिवसांनंतर नासा हे अंतराळ यान कधीही प्रक्षेपित करू शकते. हे मिशन 12 वर्षांसाठी आहे. लुसीला सूर्यमालेतून बाहेर पडायला 12 वर्षे लागतील. या दरम्यान, 5-6 ट्रोजन एस्टेरॉयड्सच्या बाजूने हा उपग्रह जाईल. हे ट्रोजन एस्टेरॉयड्स गुरु ग्रहाभोवती फिरत आहेत.
या मिशनमध्ये प्रथमच अनेक कामं केली जाणार आहेत. उदाहरणार्थ, ल्युसी प्रथमच गुरुच्या ट्रोजन एस्टेरॉयड्स मधून जाईल. सौर मंडळाच्या बाहेर पहिल्यांदाच एक यान पाठवलं जात आहे. सौर यंत्रणा आणि विश्वाच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी पहिल्यांदाच अंतराळयान प्रक्षेपित केलं जात आहे. नासाने आपल्या निवेदनात म्हटलंय की, एकाच मिशनमधून अनेक कार्ये प्रथमच होत आहेत. आम्ही इतिहासाचा शोध घेणार आहोत.
नासाने सांगितलं की, लुसी आपल्याला अंतराळाच्या प्राचीनतेबद्दल सांगेल. ग्रहांची उत्पत्ती आणि ट्रोजन एस्टेरॉयड्स च्या स्थितीबद्दल माहिती देईल. लुसी हे नाव 32 लाख वर्ष जुन्या मानवी सांगाड्यानंतर देण्यात आलं आहे. या सांगाड्यातून मानवांचं मूळ प्रकट झालं. मानवांच्या शाश्वत विकासाच्या अभ्यासात एक नवीन वळण, एक नवीन व्याख्या उघड झाली. लुसीचा शोध 1974 मध्ये लागला.
साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (एसआरआरआय) मधील लुसी मिशनचे प्रिंसिपल इन्वेस्टिगेटर हॅरोल्ड लेव्हिसन म्हणाले की जर आपण वैज्ञानिक महत्त्व बद्दल बोललो तर अवकाशात असलेले लघुग्रह हिऱ्यापेक्षा कमी नाहीत. त्यांचा अभ्यास करून आपण मोठ्या ग्रहांची रचना शोधू शकतो. सौर यंत्रणा कशी तयार झाली हे आपण शोधू शकतो.
हॅरोल्डने सांगितलं की, लुसी स्पेसक्राफ्ट (Lucy Spacecraft) 12 वर्षांच्या प्रवासात सुमारे आठ एस्टेरॉयड्सचा अभ्यास करेल. या काळात ते तीन वेळा पृथ्वीच्या जवळ येईल. त्यापैकी दोनदा सूर्यमालेच्या आतून आणि तिसऱ्यांदा सूर्यमालेच्या बाहेरून जाईल. अंतराळ शास्त्रज्ञांसाठी हे एक मोठं पाऊल आहे. आम्हाला मंगळ आणि गुरू यांच्यातील लघुग्रहांचे जग समजून घ्यायचं आहे. लुसी ज्या 8 लघुग्रहांचा अभ्यास करेल त्यापैकी सात ट्रोजन लघुग्रह आहेत. चार ट्रोजन लघुग्रह जोड्यांमध्ये आहेत. म्हणजेच, लुसी एकाच वेळी दोन लघुग्रहांचा अभ्यास करेल. तसेच दोन लघुग्रहांची छायाचित्रे पाठवेल.
अनेक प्रकारच्या लघुग्रहांचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त, लुसी स्पेसक्राफ्ट अनेक नवीन रहस्यं उघड करेल. लघुग्रहावर जीवन शक्य आहे की नाही हे देखील शोधून काढेल. त्यामध्ये फक्त सिलिकेट्स, चिकणमाती असू शकतात किंवा सेंद्रिय पदार्थ असू शकतात का याचा शोध घेईल. लघुग्रहावर काही सूक्ष्म जीवन आहे का? किंवा भविष्यात ते शक्य आहे याचा देखील शोध घेईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे