गोल पोस्ट राष्ट्रीय देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प अडविला; केजरीवाल यांचा आरोप

देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प अडविला; केजरीवाल यांचा आरोप

नवी दिल्ली, २१ मार्च २०२३: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प अडविला गेलाय, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात केलाय. “कृपा करून दिल्लीचा अर्थसंकल्प मंजूर करा” अशी विनंतीही केजरीवाल यांनी केलीय.

नियोजित कार्यक्रमानुसार आज मंगळवारी (दि.२१) दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जाणार होता. मात्र, अर्थसंकल्पातील काही तरतुदींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केंद्रीय गृह मंत्रालयानं केजरीवाल सरकारकडून उत्तर मागविलं होतं. या पार्श्वभूमीवर दिल्लीचा अर्थसंकल्प लांबणीवर पडलाय. दुसरीकडं गृह मंत्रालयानं मागविलेल्या खुलाशावरुन आम आदमी पक्ष संतप्त झालाय.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात ‘तुम्ही आम्हा दिल्लीकरांवर का नाराज आहात’ कृपा करून दिल्लीचा अर्थसंकल्प अडवू नका. हात जोडून प्रार्थना करतो, कृपया आमचा अर्थसंकल्प मंजूर करा, असं आवाहन केजरीवाल यांनी केलंय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version