फोर्ब्स इंडिया मॅगझीनने 2019 या वर्षातील भारतातील सर्वात श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. या यादीत देशातील सर्वाधिक 100 श्रीमंत व्यक्तींचा समावेश करण्यात येतो.
रिलायन्स उद्योगसमुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 2019 च्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. त्यांची संपत्ती 51.4 अब्ज डॉलर आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर जगतात प्रसिद्ध असलेले गौतम अदानी यांची संपत्ती 15.7 अब्ज डॉलर असून ते या यादीत दुसऱ्या स्थानावर आहेत.
अशोक लिलँडचे प्रमोटर हिंदुजा ब्रदर्स यांची संपत्ती 15.6 अब्ज डॉलर असून ते तिसऱ्या स्थानावर, तर शापूरची पालनजी ग्रुपचे पालनजी मिस्त्री 15 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह चौथ्या, कोटक महिंद्रा बँकेचे उदय कोटक 14.8 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह पाचव्या, तर 14.4 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह एचसीएलचे शिव नडार सहाव्या स्थानावर आहेत.
आर्थिक मंदीमुळे या वर्षात उद्योगपतींसमोरील आव्हाने वाढल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे.