तेहरान, २८ नोव्हेंबर २०२०: इराणचे अव्वल अणुशास्त्रज्ञ मोहसीन फाखरीजादेह यांची तेहरान येथे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर इराण आणि इस्राईलमधील तनाव आणखीन वाढला आहे. इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हत्येमध्ये इस्रायलचा सहभाग असल्याचे पुरावे सापडल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, फाखरीझादेह यांच्या हत्ये विषयी जी प्राथमिक माहिती मिळाली आहे त्यात वैज्ञानिकांच्या हत्येत इस्राईलचा सहभाग असल्याचा गंभीर पुरावा मिळाला आहे.
इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावद जरीफ यांचे म्हणणे आहे की, इस्राईलने यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे. जरीफ यांनी ट्विटरवर लिहिले की, “दहशतवाद्यांनी एका ज्येष्ठ इराणी शास्त्रज्ञाची हत्या केली. या हत्येमुळे इस्राईलची कोणती भूमिका आहे ते समजून येते, इस्राईल युद्धासाठी उत्सुक झाला आहे” जावेद म्हणतात की, इस्राईल चे राष्ट्रपती बेंजामिन नेतन्याहू यांनी यापूर्वी एका कार्यक्रमादरम्यान या हत्या झालेल्या वैज्ञानिकाचे नाव घेतले होते.
स्थानिक वृत्तानुसार तेहरानजवळ फाखरीजादेह यांची हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळ्या झाडल्या ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
वृत्तानुसार, २००३ पासून थांबलेल्या इराणच्या गुप्त अणुबॉम्ब कार्यक्रमाचे फखरीझादेह नेतृत्व करीत असल्याचा आरोप बर्याच काळापासून होत आहे. तथापि, इराणने अण्वस्त्रे बनविण्याच्या आरोपाचे सातत्याने खंडन केले आहे. इराणचे सैन्य कमांडर हुसेन देहघन यांनी ट्विट केले आहे की, “आम्ही या हत्येचा जोरदार बदला घेऊ आणि या घटनेमागे जे कोणी आहेत त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल पश्चात्ताप होईल.”
सध्या या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही. इस्राईलनेही इराणच्या आरोपाला उत्तर दिले नाही. मोहसीन फाखरीझादेह यांना ‘द फादर ऑफ इराणी बॉम्ब’ म्हटले गेले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे