परराष्ट्र मंत्री कुरेशी बनू शकतात पाकिस्तानचे नवे पंतप्रधान…?

इस्लामाबाद, 16 ऑक्टोंबर 2021: इम्रान खान आणि लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्यात गुप्तचर संस्था आयएसआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीवरून तणाव कायम आहे.  बाजवा यांच्या शिक्कामोर्तबानंतर 9 दिवस झाले तरी इम्रान खान यांनी नवीन प्रमुख नदीम अंजुम यांच्या नियुक्ती पत्रावर सही केली नाही.  आता पाकिस्तानी माध्यमांच्या वर्तुळात असा दावा केला जात आहे की जर इम्रानने लष्करप्रमुखांशी वाद करणं थांबवलं नाही तर लवकरच पाकिस्तानला शाह मेहमूद कुरेशींच्या रूपात नवा पंतप्रधान मिळू शकतो.
गमतीशीर गोष्ट अशी आहे की, जेव्हा कुरेशींना प्रसारमाध्यमांनी याबद्दल प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी अनोख्या अंदाजानं उत्तर दिलं.  माध्यमांनी थेट प्रश्न विचारला- तुम्ही वजीर-ए-आझम (पंतप्रधान) होणार आहात का?  तुम्ही नवीन शेरवानी शिवली आहे का?
कुरेशी यांची गमतीशीर प्रतिक्रिया
  शाह मेहमूद कुरेशी गुरुवारी संध्याकाळी बैठकीनंतर बाहेर आले, तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना घेरले.  प्रश्न फक्त एकच होता – तुम्ही पंतप्रधान होणार आहात का?  प्रतिसादात कुरेशी हसले आणि म्हणाले – कुछ हसरतें ऐसी होती हैं, जो हसरतें ही रह जाती हैं.
पुन्हा एकदा, जेव्हा त्यांना स्पष्ट उत्तर देण्यास सांगितलं गेलं, तेव्हा कुरेशी म्हणाले – काही इच्छा अशा असतात की प्रत्येक इच्छा पूर्ण होते.  यावर प्रसारमाध्यमांनी पुन्हा विचारलं की, तुम्ही अजूनही इम्रान खान यांच्यासोबत आहात का, मंग याचं उत्तर देण्याऐवजी ते तिथून निघून गेले.  मग एका पत्रकारानं विचारलं- आम्ही ऐकलं आहे की तुम्हाला नवीन शेरवानी शिवली आहे?  कुरेशी यांनी मागं वळून पाहिले, हसले आणि नंतर पुढं निघून गेले.
कुरेशींवर दावा का
पाकिस्तानच्या राजकीय वर्तुळात नेहमीच असं म्हटलं जात आहे की, कुरेशी पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक होते, एकदा युसूफ रझा गिलानी आणि दुसऱ्यांदा इम्रान खान यांनी त्यांचा मार्ग अडवला.  विशेष गोष्ट म्हणजे कुरेशी आणि लष्कर यांच्यात खोल आणि चांगले संबंध आहेत.  इम्रान खान यांना तर पूर्ण विपक्ष इलेक्टेड पंतप्रधान न म्हणता सिलेक्टेड पंतप्रधान म्हणताहेत.
यावेळी कुरेशींना संधी
 इम्रान आणि लष्करप्रमुख यांच्यातील संबंध बरेच तणावपूर्ण झाले आहेत.  कुरेशी यांना इम्रान सरकारच्या उर्वरित दीड वर्षांसाठी खुर्चीवर बसवलं जाऊ शकतं, असं मानलं जात आहे.  यामध्ये, शेख रशीद सारखे लष्कराचे चाटुकार मंत्री मदत करू शकतात.
 कुरेशी यांचीही चांगली प्रतिमा आहे आणि त्यांचे इतर पक्षांशीही चांगले संबंध आहेत.  ते आसिफ अली झरदारी आणि बेनझीर भुट्टो यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये राहिले आहेत.  काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या संसदेमध्ये बेनझीर यांचा मुलगा बिलावलने कुरेशींवर निशाणा साधला आणि म्हणाला – इम्रानने कुरेशींशी सावधगिरी बाळगली पाहिजे.  पंतप्रधान होण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा