माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन

पुणे, ५ ऑगस्ट २०२०: राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज पहाटे पुण्यामध्ये निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. आज पहाटे सव्वा दोनच्या दरम्यान त्यांचे पुण्यातील रुग्णालयामध्ये दुःखद निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोविड -१९ ची लागण झाली होती. यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली होती. मात्र, याबरोबरच त्यांना किडनीचा देखील विकार होता. कोविड -१९ मधून बरे झाल्यानंतर त्यांच्या किडनी वर उपचार सुरु होते या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या महिन्यात १५ जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर १६ जुलै रोजी ते पुढील उचारासाठी लातूरहून पुणे येथील रुबी हॉल मध्ये दाखल झाले होते. रुबी हॉल मध्ये त्यांच्या वर किडनीच्या आजारावर उपचार सुरू होते याच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते मूळ लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील रहिवासी होते. त्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार देखील निलंग्यातच होणार आहेत.

निलंग्यातूनच त्यांनी आपली राज्यच नव्हे देशभर निलंगेकर म्हणून ओळख निर्माण केली होती. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस आणि गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ पर्यंत म्हणजेच ०९ महिन्याच्या अल्प काळासाठी महाराष्ट्राचे १० वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा