केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन, वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

13

पुणे,१८ जुलै २०२३ : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचं निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जर्मनी मध्ये उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.चांडी हे एकाच मतदारसंघातून १२ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, केरळचे माजी मुख्यमंत्री ओमान चांडी यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने केरळच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले.त्यांच्यावर जर्मनी मध्ये उपचार सुरू होते.केरळ काँग्रेसचे अध्यक्ष सुधाकरन आणि ओमान चांडी यांच्या कुटुंबियांनी याबाबतची माहिती दिली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर