जालना ८ डिसेंबर २०२३ : जालन्यातील परतूर येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते सी सी आय कापूस खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवावी असे आवाहन लोणीकर यांनी शेतकऱ्यांना केले. परतुर आणि आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा विकास करणे आपले ध्येय असून केंद्र आणि राज्य सरकार मार्फत या कृषी उत्पन्न बाजार समिती विकसित करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांसाठी गोडाऊनची व्यवस्था ,शेतकरी निवास, पिण्याचे शुद्ध पाणी यासोबतच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रस्ताव पणन मंडळाकडे पाठवले असल्याचे लोणीकरांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की, पारंपारिक पद्धतीने शेती करणे आता दुरापास्त झाले असून पारंपारिक शेतीच्या, जीवावर शेतकऱ्यांचे फारसे भागत नाही या पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी असेही यावेळी त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या विकासामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची भूमिका महत्त्वाची असून ही भूमिका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पार पाडावी प्रशासन उत्तम चालावे यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थितासी बोलताना सांगितले. अक्षय जिनिंग मध्ये आयोजित सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर