माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ह्रदयविकाराचा झटका

नवी दिल्ली, २४ जुलै २०२३ : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आज ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी असताना जाधव यांना छातीत दुखू लागले. यावेळी समयसूचकता दाखवत गडकरींच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी जाधव यांना तात्काळ नजीकच्या आरएमएल रुग्णालयात हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

जाधव हे कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाधव यांनी मार्च महिन्यात तेलंगाणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा