माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना CBI कडून अटक

मुंबई, २५ सप्टेंबर २०२२ : नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक केली आहे. त्यांना यापूर्वीही ED ने अटक केली होती. दरम्यान आता न्यायालयाने संजय पांडे यांना अधिक तपासासाठी ४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.

माझी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना या अगोदर दिल्ली ED कडून अटक करण्यात आली होती. तसेच त्यांची चौकशीही सुरु होती. दरम्यान, २ ऑगस्ट रोजी अव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर कोर्टाने त्यांना १६ ऑगस्ट पर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, यानंतर संजय पांडे यांच्या वतीने देखील जामिनासाठी अर्ज केला होता, पण त्यांना जामीन दिला नाही. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) फोन टॅपिंग प्रकरणात नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे माजी प्रमुख रवी नारायण यांचा यात सहभाग आहे.

पांडे हे नुकतेच निवृत्त झाले आहेत. २००९ ते २०१७ दरम्यान NSE कर्मचाऱ्यांचे फोन कॉल्स बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केल्याचा त्यांच्यावर आरोप असून माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याबद्दल असे बोलले जाते की त्यांची एक कंपनी होती – iSec सर्व्हिसेस ज्याच्या मदतीने एनएसई कर्मचाऱ्यांचे फोन टॅप करण्यात आले. या संपूर्ण कामासाठी संजय पांडेंना ४.४५ कोटी रुपये दिल्याचे ईडीच्या तपासात समोर आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा