नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट २०२०: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले आहे. प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी सायंकाळी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नुकतेच प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, यादरम्यान त्यांच्यावर शस्त्रक्रिया ही झाली होती. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी प्रणव मुखर्जी यांच्या मृत्यूची माहिती ट्विट केली.
प्रणव मुखर्जी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते आणि नुकतीच त्यांच्या मेंदू वर शस्त्रक्रिया झाली होती. प्रणव मुखर्जी २०१२ मध्ये देशाचे राष्ट्रपती बनले, २०१७ पर्यंत ते राष्ट्रपती होते. सन २०१९ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांची प्रकृती खराब झाल्याने १० ऑगस्टला त्यांना दिल्लीतील आरआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्यानंतर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.