पुणे ३ सप्टेंबर २०२०
महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय गोविंद एकबोटे ( वय ८४) यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. गुरुवारी दि.०३/०९/२०२० रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास त्यांनी जगाचा निरोप घेतला.
दत्तात्रय एकबोटे हे समाजवादी विचारसरणीचे व्यक्तिमत्व होते. समाजवादी पक्ष, जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी राज्याचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
गोल्फ क्लब आणि विडी कामगारांसाठी त्यांनी खराडी परिसरात घरे उभारली आहेत. त्यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. महाराणा प्रताप उद्यानात त्यांनी एस एम जोशी यांचा प्रणाकृती पुतळा उभारला होता.
यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि नातू असा परिवार आहे. गरिबांचे नेते म्हणून त्यांना पुण्यात ओळख आहे.