कदम वाकवस्तीचे माजी सरपंच नंदू काळभोर यांची कोविड सेंटरला भेट

7

लोणी काळभोर २० जुलै २०२० : आज दि. २० जुलै रोजी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वराज हॉस्पिटलच्या स्वंतत्र इमारतीत कोविड केअर सेंटर सुरू आहे.

माजी सरपंच नंदू काळभोर यांनी आज हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच या ठिकाणी विलगीकरण केलेल्या व्यक्तींची व कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधून येथे त्यांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा व इतर अनुषांगिक सुविधांची माहिती घेतली. या कोविड केअर सेंटर मध्ये जिल्हा प्रशासनाने बेडची व्यवस्था केलेली आहे.

सद्यस्थितीमध्ये या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण व विलगीकरण कक्षात ठेवलेल्या रुग्णांची विचारपूस करून चौकशी केली व संबंधित हॉस्पिटल मधील डॉक्टरांशी चर्चा केली असता, त्यांनी सांगितले की अतिशय चांगल्या पद्धतीने डॉक्टर रुग्णाची काळजी घेतात व ज्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये काही त्रास असेल तर त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना त्वरित कळवावे असे नंदू काळभोर यांनी सांगितले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा