दिल्ली, २२ ऑगस्ट २०२३: छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटपातील कथित अनियमिततेशी संबंधित कोळसा घोटाळा प्रकरणात दिल्ली न्यायालयाने मंगळवारी पोलाद मंत्रालयाच्या एका माजी अधिकाऱ्याला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
विशेष न्यायाधीश अरुण भारद्वाज यांनी पोलाद मंत्रालयाच्या जेपीसी (जॉइंट प्लांट कमिटी) चे माजी कार्यकारी सचिव गौतम कुमार बसाक यांना विजय सेंट्रल कोल ब्लॉकच्या वाटपात भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावला. मंत्रालयाने बसाक यांना आरोपाची सत्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले होते.
प्रकाश इंडस्ट्रीज लिमिटेड, ज्याने जानेवारी २००७ मध्ये कोळसा ब्लॉकसाठी अर्ज केला होता, त्यांच्या फिर्यादीनुसार, पोलाद मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने २००८ मध्ये कंपनीने केलेल्या दाव्यांचे समर्थन करणारा खोटा अहवाल सादर केला. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणात कंपनी आणि संचालकांची निर्दोष मुक्तता केली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेले अपील सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड