दिल्ली, १३ सप्टेंबर २०२०: पूर्व केंद्रीय मंत्री रघुवंशी प्रसाद यांचे रविवारी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते फुफ्फुसाच्या आजारामुळे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात भरती होते. परंतु, त्यांची प्रकृती अधिक खराब झाल्यामुळे रघुवंश प्रसाद सिंग यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. तीन दिवसांआधीच त्यांनी लालूप्रसाद यादव यांना पत्र लिहून राष्ट्रीय जनता दल आरजेडी याच्यातून राजीनामा दिला होता. मृत्यूनंतर जेडीयू नेता के सी त्यागी यांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांचा उपचार हा एम्स रुग्णालयामध्ये सुरू होता. दोन दिवसांआधी त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती, त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर पटनामधील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचाराकरिता त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस आधीच त्यांनी आर जे डी चा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
रघुवंश प्रसाद सिंग हे १९७७ पासून राजकारणात आहेत. त्यांना लालूप्रसाद यादव यांच्या खूप जवळचे तसेच संकट मोचन ही मानले जायचे. त्यांच्या पार्टीमध्ये त्यांना दुसरा लालूप्रसाद असे म्हटले जायचे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे