माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या भावाची तालिबानने केली निर्घृण हत्या

29
पंजशिर, ११ सप्टेंबर २०२१: तालिबानने अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांचे मोठे बंधू रोहुल्लाह सालेह यांची हत्या केली आहे.  तालिबानच्या सूत्रांनी दावा केला की रोहुल्लाह सालेह हे पंजशीर खोऱ्यातच मारले गेले.  सूत्रांनी सांगितले की, तालिबान्यांनी अत्याचार केल्यानंतर रोहुल्लाह ठार झाले.  तालिबान्यांनी प्रथम सालेह यांना चाबकाने आणि विजेच्या तारांनी मारले, नंतर त्यांचा गळा कापला.  नंतर सालेह तडफडत असताना  त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला.
 असे सांगितले जात आहे की रोहुल्लाह सालेह पंजशीरहून काबुलला जात होते.  तालिबानला याची माहिती मिळाली.  त्यांनी सालेहला घेरले आणि त्यांना बंदिवासात नेले आणि निर्घृणपणे त्याची हत्या केली.  मात्र, खुद्द अमरूल्लाह सालेह यांनी या प्रकरणावर आतापर्यंत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.
 तालिबानने पंजशीरमधील त्या जागेचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे जिथे काही दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी हा व्हिडिओ जारी केला होता.  अमरुल्ला सालेह यांनी तालिबानच्या दाव्यांचे खंडन करत एक व्हिडिओ जारी केला आणि म्हटले की ते पंजशीरमध्ये आहेत आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत तिथेच राहतील.
तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर १५ ऑगस्ट रोजी राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी देश सोडून पळून गेले.  यानंतर उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनी स्वतःला राष्ट्रपती घोषित केले.  त्याचबरोबर त्यांनी, पंजशीरच्या लढवय्यांसह राष्ट्रीय प्रतिरोध दलाच्या बॅनरखाली तालिबानच्या विरोधात रणशिंग फुंकले.  तालिबानने काही दिवसांपूर्वी पंजशीर येथे विजयाचा दावा केला होता.  त्यांनी पाकिस्तानी हवाई दलाच्या पाठिंब्याने पंजशीरच्या दोन मोठ्या नेत्यांची हत्या केली होती.  तालिबानने नॉर्दर्न अलायन्सचे कमांडर आणि बंडखोर प्रवक्ते फहीम दष्टी आणि जनरल अहमद शाह मसूद यांचे पुतणे जनरल वदुद यांची हत्या केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे