जूनी सांगवीत सापडले २ पॉझिटीव्ह रुग्ण

5

पिंपरी चिंचवड, दि. २ मे २०२०: पिंपरी-चिंचवड मध्ये काल दिवसभरात एकही रुग्ण न सापडल्याने पिंपरी चिंचवडकरांना अंशतः दिलासा मिळाला होता. परंतू रात्री उशिरा रुग्णांचा तपासणी अहवाल एनआयव्ही कडून प्राप्त झाला असता या रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. हे रुग्ण जुनी सांगावी भागातील आहे.

पिंपरीचिंचवड महानगरपालिका वैद्यकीय विभागाने दिलेल्या माहिती नुसार काल ( शुक्रवार ता.१ मे ) रोजी दोन रुग्णांचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला असून दोन्ही रुग्ण हे एकाच घरातील असून २० वर्षाचा मुलगा व वडील वय ४६ वर्ष दोघेही जुनी सांगवीतील मधूबन परिसरातील असल्याचे स्पष्ट झाले.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच सामाजिक अंतर पाळून काळजी घेण्याचे व नाहक गर्दी टाळण्याचे आवाहन पिंपरीचिंचवड महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा