पेण, २३ फेब्रुवारी २०२४ : पेण तालुक्यात विविध प्रकारच्या विकासकामांची मालिका मोठ्या प्रमाणात सुरु असून आज तालुक्यातील अंतोरे गावातील विविध ठिकाणच्या लाखो रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अंतोरे आदिवासी वाडी येथील डांबरी रस्ता, लक्ष्मी नगर येथील सिमेंट काँक्रिट रस्ता, साजिरा मंदिर येथील सिमेंट काँक्रिट रस्ता, मुख्य सिमेंट काँक्रिट रस्ता आदी ठिकाणच्या रस्त्यांसाठी पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र पाटील तसेच माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी पुढाकार घेऊन जी कामे आणली त्यांचे भूमिपूजन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सरपंच अमित पाटील, उपसरपंच प्रशांत पाटील, अशोक थळे, संदेश पाटील, राजू पाटील, नितेश पाटील, जनार्दन पाटील, अजित लांगी, अक्षय थळे, पप्पू थळे, विलास पाटील, सागर कोळी, प्रदीप पाटील यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना वैकुंठ पाटील म्हणले कि, ‘आज विविध प्रकरच्या लाखो रुपयांच्या रस्त्यांच्या भूमिपूजनाचे काम झाले आहे, मात्र आता या भागातील तरुणाईसाठी लाखो रुपये खर्च करून आपण लवकरच व्यायामशाळा साहित्य देखील उपलब्ध करून देणार आहोत. आज या भागातील तरुण पिढी गावच्या विकासासाठी एकत्र आलेली पाहून खूप आनंद होत असून अंतोरे गावच्या विकासासाठी आम्ही कटिबध्द आहोत’, असे त्यांनी सांगितले.
न्यूज अनकट प्रतिनीधी : स्वप्निल पाटील