ठाण्यात एका रात्रीत चार ठिकाणी आग

ठाणे, दि. १९ जुलै २०२०: ठाण्याच्या पोखरण रोडवरील एका हॉटेलमध्ये मध्यरात्री आग लागण्याची घटना घडली. घटनेत गांभिर्य पाहता ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या घटना स्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

पोखरण रोडवरील आगीच्या घटनेसह वागळे ईस्टेटजवळील इंदिरा नगरमधील एका दुकाला आग लागली मात्र एवढंच नव्हे तर ठाणे परिसरात रात्रभरात आगीच्या किरकोळ अश्या चार घटना घडल्या आहेत. याशिवाय कोपरीच्या आनंदनगर जवळ एक झाड पडले तर ठिकठिकाणी शहर परिसरात झाडाच्या फांद्या तुटल्याच्या चार घटना घडल्या आहेत. कळवा ब्रीज, खारटन रोड परिसरात रात्री केमिकल्सचा वास येत असल्याची तक्रार येताच ठाणे महापालिकेच्या पथकाने या परिसरात जाऊन पाहणी केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा