साताऱ्यात देवदर्शनाला निघालेल्या भविकांवर काळाचा घाला, ओमनी कार झाडावर आदळून चार जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

सातारा, १० ऑगस्ट २०२३ : देवदर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला. ओमनी कार झाडावर आदळून भाविकांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी वडूज आणि सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील पेट्रोल पंपानजीक सूर्याचीवाडी हद्दीत ही दुर्घटना घडली. बाळू मामाच्या मेंढराचे एक देवस्थान लाकरेवाडी येथे आहे. तेथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी हे बनपुरी, सिधेश्वर कुरोली येथील रहिवासी असल्याचे समजते. तिघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी-मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे पहाटे सहा वाजता ओमनी कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या. तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती वडूज पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी हलवले. अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून हलवले असून, वडूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा