खरीप हंगामातील पिकांना पावसाची प्रतीक्षा

हिंगोली, १० ऑगस्ट २०२३ : जवळाबाजार परिसरात मागील दहा दिवसांपासून खरीप हंगामातील पिकांना पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पिकांची कोळपणे व फवारणी झाली पण पिकांच्या वाढीसाठी पावसाची गरज आहे. आजपर्यंत खरीप हंगामातील पिकासाठी लागणारा पाउस वेळेवर पडत गेला. पण परिसरात मागील दहा ते बारा दिवस पाऊस झाला नाही, त्यामुळे खरीप हंगामात पिके पावसाच्या अभावी धोक्यात आली आहेत.

या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडेल या आशेवर शेतकरी बांधवांनी हजारो रुपायांची बियाणे व खते खरेदी केली. पण पावसाच्या विलंबाने खरीप हंगामातील पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी बांधवांनी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची पेरणी केली, नंतर पावसाने दडी मारली आहे. दहा ते बारा दिवस झाले तरी पावसाचे आगमन झाले नाही. आता पावसाअभावी ही पिके धोक्यात आली आहेत.

पावसाअभावी जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. दरम्यान काही शेतकरी पाण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी पिकांस स्प्रिंकलरने पाणी देऊन पिकास जीवनदान देत आहेत. मात्र अनेकवेळा पाणी उपलब्ध असुनही विज पुरवठा खंडित होत असल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा