गोल पोस्ट गुन्हा आपापसातील हाणामारीत चार जणांचा मृत्यू…

आपापसातील हाणामारीत चार जणांचा मृत्यू…

श्रीगोंदा, २१ ऑगस्ट २०२०: श्रीगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील तीन तरुणांचा देवळगाव सिद्धी येथील एकाशी विसापूर फाटा येथे काही कारणावरून झालेल्या आपापसातील हाणामारीत चारही जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार लिंब्या हब्र्या काळे (वय २२ वर्षे) देऊळगाव सिद्धी, तर सूरेगाव येथील नातीक कुंजा चव्हाण (वय ४० वर्षे), नागेश कूंजा चव्हाण (वय १४ वर्षे), श्रीधर कूंजा चव्हाण (वय ३५ वर्षे), यांची एकमेकांत झालेल्या जबर हाणामारीत धारदार शस्त्राने वार झाल्याने चारही जण मयत झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व मयत विसापूर फाटा येथे गांजा आणण्यासाठी गेले होते. त्यांच्यात मागील काही वादाच्या कारणावरून सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली. यात चौघे जण जागीच ठार झाले. कुंजा चव्हाण याच्या घरच्यांना घटनेची माहिती समजल्यानंतर यातील तिघांना सुरेगाव येथील पालावर नेण्यात आले. तर, लिंब्या हाब्र्या काळे याला विसापूर फाटा येथेच सोडून दिले. मयत व्यक्तींना मोटर सायकल वरून सूरेगावात आणण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यावर बेलवंडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने व पोलीस उप निरीक्षक प्रकाश बोऱ्हाडे हे घटनास्थळी जात पुढील कारवाई सुरू करण्यात आल्याचे समजते आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version