गोल पोस्ट इतर पर्यावरण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण…

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण…

इंदापूर, २१ ऑगस्ट २०२०: आधुनिक भारताचे जनक व संगणक क्रांतीचे प्रणेते भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर तालुक्यातील सणसर येथे इंदापूर काँग्रेसच्या वतीने शासकीय दवाखान्याच्या कुंपणाच्या बाजूला व श्री कृष्णा मंदिराच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

राजीव गांधी यांचे विचार आणि काँग्रेस पक्ष्याची विचारसरणी तालुक्यातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे स्वप्नील सावंत यांनी यावेळी न्यूज अनकटशी बोलताना सांगितले.

या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष स्वप्नील सावंत उपाध्यक्ष बिभीषण लोखंडे युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल बंडगर, विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंभूराजे साळुंखे, इंदापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव भोंग युवक काँग्रेसचे सचिव सुफियान जामदार व युवा तालुका सरचिटणीस अरुण राऊत, भूषण बोराटे, निखिल निंबाळकर आदी उपस्तिथ होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

error: Content is protected !!
Exit mobile version