जम्मू काश्मीरमध्ये भूस्खलन, ट्रक दरीत कोसळून चार ठार, सहा जनावरे दगावली

जम्मू-काश्मीर, १२ सप्टेंबर २०२३ : जम्मू काश्मीरमध्ये ट्रक एका दगडाला धडकून खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत चारजण ठार झाले, तर सहा जनावरे दगावली. रामबन जिल्ह्यातील बनिहाल परिसरातील शेर बीबीजवळ आज सकाळी हा अपघात घडला. पोलीस आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह बाहेर काढले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक जम्मूहून श्रीनगरला जात होता. दरम्यान रस्त्यावरील एका मोठ्या दगडाला धडकून तो रस्त्यावरुन घसरला. ट्रक खोल दरीत कोसळल्यांने चारही प्रवासी जागीच ठार झाले आहेत. या ट्रकमधून नेत असलेल्या सहा जनावरांचाही या अपघातात मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत सांगितले आहे.

किश्तवारी पाथेर बनिहाल येथे भुस्खलन झाले आहे. त्यामुळे जम्मू-श्रीनगर हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना NH-44 वर प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे देखील एका वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा