चंद्रपूर, २६ सप्टेंबर २०२२ : चंद्रपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एकाच कुटुंबातील चौघा जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. सदर घटनेत एका महिलेचा मृत्यू झालाय. तर अन्य तिघा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर तिघा जणांना ताबडतोब रुग्णालयामध्ये दाखल केलंय.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहिती प्रमाणे ब्रम्हपुरी शहरामध्ये सहकार कॉलनी येथे सदर घटना घडली. रमाकांत दामोधर ठाकरे ५५ वर्षे, गीता रमाकांत ठाकरे ५० वर्षे, राहुल रमाकांत ठाकरे २८ वर्षे, मनोज रमाकांत ठाकरे २६ वर्षे अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे आहेत.
रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान गीता ठाकरे यांचा मृत्यू झाला. तर इतर तिघा जणांवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेतील सर्वांनी रविवारी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेच्या कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर