अवघ्या चार महिन्यात शेवग्याचे भरघोस पीक; लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांने वाटले फुकट

पुरंदर, देि.४ जून २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथील एका शेतकऱ्याने घेतलेल्या शेवग्याचे पिक अवघ्या चार महिन्यात भरघोस प्रमाणात आले आहे. विशेष म्हणजे या शेवग्याच्या झाडांना तीन ते चार फूट लांबीच्या शेंगा लागल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे या शेतकऱ्यांनी सर्वच्या सर्व पीक लोकांना मोफत वाटले आहे. त्याचबरोबर अजूनही शिल्लक राहिलेले शेंगा मोफत घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

जेजुरी येथील एम.आय.डी.सी.परिसरामधील लहू नाना शिंदे हे प्रामुख्याने किराणा दुकान चालवतात. तिथेच त्यांची १५ गुंठे जमीन आहे. त्या जमिनीमध्ये शेवगा लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बोअरवेलचे पाणी ठिबक पद्धतीने वापरत त्यांनी १५ गुंठ्याच्या शेतात जानेवारी महिन्यात१२५ शेवग्याची झाडे लावली. त्या प्रत्येक झाडाला ६० ते ७० शेंगा लागल्या असून एका शेंग्यांची लांबी तीन ते चार फुट एवढी आहे. त्याच बरोबर या शेवग्याच्या झाडाची वाढ ही चांगली झाली आहे. अगदी सात ते आठ फूट उंची पर्यंत ही झाडे वाढली आहेत. परिसरातून अनेक लोक या चार फूट लांबीच्या शेंगा पहायला येत आहेत.
शिंदे म्हणाले की, या शेतात काय पीक घ्यावे हा आमच्या समोर मोठा प्रश्न होता. कमी पाण्यात येणारे पीक म्हणून आम्ही हे पीक निवडले. घरासमोरील बोअरवेलचे पाणी त्याला ठिबकने दिले.चारच महिन्यात त्याला शेंगा लागल्या पण लॉकडाऊनमुळे त्यांना बाजार पेठ उपलब्ध झाली नाही, म्हणून परिसरातील लोकांना या शेंगा मोफत वाटल्या.आजही झाडाला चांगल्या शेंगा आहेत.त्या आम्ही लोकांना मोफत देत आहोत.

न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा