मुंबई: करोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढला आहे. खबरदारी म्हणून राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आज दिवसभरात नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील रुग्णांची संख्या १६ झाली असून, राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा हा ३७ वर पोहोचला आहे.
मुंबईत देखील आज ४ नवीन रुग्ण सापडले आहेत. मुंबईत ३ आणि नवी मुंबई एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ वर आणि नवी मुंबतील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. कालही पिंपरी चिंचवडमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला होता.
राज्यात करोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परीक्षा सुरू राहतील. ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये सुरू राहतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली होती.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या:
पुणे – १६
मुंबई – ८
ठाणे – १
कल्याण- २
नवी मुंबई – २
पनवेल – ४
नागपूर – ४
अहमदनगर – १
यवतमाळ -२
औरंगाबाद – १