वेदांता फॉक्सकॉनच्या सेमीकंडक्टर प्रकल्पातुन फॉक्सकॉन बाहेर

मुंबई, ११ जुलै २०२३ : गेल्या वर्षी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार पायउतार झाले आणि शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले. हे सरकार आल्यानंतर काही दिवसातच वेदांता फॉक्स्वानचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरात मध्ये हलवण्यात आला. यावर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी विरोधकांकडून गुजरातला खुश करण्यासाठी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. तर आता या प्रकल्प बाबत नवीन माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकार आणि विरोधकांच्यात चांगलाच वाद झाला होता. त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करताना फक्त दिल्लीच्या तख्ताला खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातच्या झोळीत टाकला अशी टीका केली होती. हाच वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प आता अडचणीत सापडला असून आता गुजरातमधील त्याच्या भवितव्यालाच ब्रेक लागला आहे.

तैवानची कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने वेदांता लिमिटेडसोबतचा असलेला त्यांचा करार तोडला आहे. ज्यामुळे आता यात फॉक्सकॉन नसेल. याच्या आधी फॉक्सकॉन आणि वेदांत यांनी महाराष्ट्रात गुंतवणुकिची तयारी दाखवली होती. तसेच त्यासाठी महाराष्ट्रात चाचपणी सुरू होती. मात्र काही कारणास्तव हा $ १९.५ अब्ज गुंतवणुकीचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये गेला.त्यानंतर राज्यात याचे तीव्र पडसाद उमटले होते. आता फॉक्सकॉनने वेदांता बरोबरचा आपला करार मोडल्यामुळे फॉक्स कॉन सेमीकंडक्टर प्रकल्पामधून बाहेर पडली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा