एफपीआयने मार्चमध्ये स्टॉक मार्केटमधून काढले ५,१५६ कोटी रुपये

मुंबई, ८ मार्च २०२१: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेच्या बाँड यील्ड वाढल्यामुळे आणि प्रॉफिट बुकींग मुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (एफपीआय) भारतीय बाजारातून ५,१५६ कोटी रुपये काढून घेतले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून एफपीआय भारतीय बाजारपेठेतील निव्वळ गुंतवणूकदार होते. एफपीआयने जानेवारीत भारतीय बाजारपेठेत २३,६६२ कोटी रुपये आणि जानेवारीत १४,६४९ कोटी रुपये गुंतवले आहेत. 
 
डिपॉझिटरीच्या आकडेवारीनुसार, १ ते ५ मार्च दरम्यान एफपीआयने शेअर बाजारातून ८८१ कोटी रुपये आणि कर्ज किंवा बाँड मार्केटमधून ४,२७५ कोटी रुपये काढले आहेत.  अशाप्रकारे, त्यांचे एकूण पैसे काढणे ५,१५६ कोटी रुपये आहे.  एफपीआयने गुंतवणूक काढून घेतल्यानंतरही मार्च चा पाहिला आठवडा भारतीय शेअर बाजारासाठी उत्तम राहिला.
 
सेन्सेक्सच्या पहिल्या दहा कंपन्यांपैकी आठ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात १.९४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.  रिलायन्स इंडस्ट्रीजला सर्वाधिक फायदा झाला.  दुसरीकडे एचडीएफसी बँक आणि भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांचे बाजार भांडवल कमी झाले.
 
 रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल ६०,०३४.५१ कोटी रुपयांनी वाढून १३,८१,०७८.८६ कोटी रुपये झाले.  टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) चे बाजार मूल्यांकन ४१,०४०.९८ कोटी रुपयांनी वाढून ११,१२,३०४.७५ कोटी रुपये आणि कोटक महिंद्रा बँक २८,०११.१९ कोटी रुपयांनी वाढून ३,८१,०९२.८२ कोटी रुपयांवर पोहोचले.  
 
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा